काश ! कोरोना नसता तर ?
- Get link
- X
- Other Apps
काश ! कोरोना नसता तर ?
काश ! कोरोना नसता तर ?
किती छान झाले असते ..
सर्वाना आपल्या मनासारखे जगता आले असते ...
लॉकडाउन, मास्क, सॅनिटायझर, आणि सोशल डिस्टेनसिंग यांनी
त्रस्त असलेले जीवन वाट्याला आलं नसत...
काश ! कोरोना नसता तर ?
लोकांची खाण्यापिण्याची कुचंबणा झाली नसती ...
रोजमजुरी करून हातावर आणून
पानावरती खाणाऱ्या गरिबांची
आबाळमात्र झाली नसती ...
काश ! कोरोना नसता तर ?
भविष्य घडवू बघणाऱ्या
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक
नुकसान झाले नसते ..
काश ! कोरोना नसता तर ?
कित्येक मुले आई वडिलांच्या
प्रेमाला मुकली नसती ...
काश ! कोरोना नसता तर ?
कित्येक लोकांना आपले मित्र,
नातेवाईक, आप्तेष्टान पासून दूर
होण्याची वेळ आली नसती ...
काश ! कोरोना नसता तर ?
कित्येक मुलींचे लग्नाचे असलेले
काश ! कोरोना नसता तर ?
जागतिक वैफल्यग्रस्त , नैराश्यपूर्ण व
भययुक्त वातावरण निर्मिती झाली नसती ..
- Get link
- X
- Other Apps
Comments
सुपर काश... कोरोनानसता तर....
ReplyDeletethanks sir for your motivational words
Delete