असे हे आपले पुरके सर.. मराठी कविता १०
असे हे आपले पुरके सर...
खेळ असो ,नृत्य असो ,संगीत असो की असो सूत्रसंचालन विद्यार्थ्यांना घडवीण्यासाठी सतत धडपडणारे
असे हे आपले पुरके सर...
समुद्राच्या तळापेक्षाही खोल त्यांच्या अंतर्मनाची खोली..
अन् पर्वताच्या उंचीपेक्षाही मोठी त्यांची कीर्ती..
समायोजनाचे सूत्र हाती घेवून जीवनातील जबाबदारीचे जणू शिवधनुष्यच पेलणारे
असे हे आपले पुरके सर...
सीनियर ज्युनिअर असा कधी भेदच त्यांनी केला नाही..
अन कुणालाही न दुखवता फक्त
हो सर म्हणूनच सर्वांची मने जिंकणारे
असे हे आपले पुरके सर...
विनोदी, खेळकर,निरागस असे फुलांसारखे त्यांचे व्यक्तिमत्व
जणू लोकनायक परिवारातील
भाऊ कदमच..
असे हे आपले पुरके सर...
कुणाचा अपमान करणे, दुखवणे कुणाची उणीदुणी काढणे
हा मुळात त्यांचा स्वभावच नाही असे निकोप स्वच्छ मनाचे
असे हे आपले पुरके सर...
चित्रपटांन प्रमाणेच आपल्या
सर्वांनाच कार्यरत असतांना
कॉमिक रिलीफ देणारे
असे हे आपले पुरके सर...
सर्वांचा सन्मान करणारे,
सर्वांचा आदर करणारे,
सर्वांना मार्गदर्शन करणारे,
सर्वांना समजून घेणारे
सर्वांना सहकार्य करणारे
असे हे आपले पुरके सर...
कवी:- सुमित अतकुलवार
Comments
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box