मानवी नातेसंबंध विविध पैलू व आधुनिक तंत्रज्ञान
माणूस म्हटलं की तो एक समाजाचा घटक असतो त्या ठिकाणी राहात असताना त्याचे एकमेकांशी काही ऋणानुबंध जुळतात त्यालाच आपण नाते म्हणतो ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे यात कुठलेही नाविन्य नाही कारण मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे .त्यामुळे त्याची विविध पैलू असलेले आपणास दिसतात.
नातेही प्रामुख्याने दोन प्रकारची असलेले आपणास दिसून येतात ,पहिलं म्हणजे रक्ताची नाती दुसरे म्हणजे बिन रक्ताची नाती अशा प्रकारची नाती प्रामुख्याने अस्तित्वात असलेले आपणास दिसून येते.
जीवन जगत असताना आपणास विविध गोष्टींशी आपला संबंध येत असतो, त्यावेळेस आपणास काही अडचणींचा सामना करावा लागतो .त्यावेळेस सहकार्य करण्यासाठी नातेसंबंध उपयोगी येताना आपणास दिसून येतात. मानवी जीवन जगत असताना प्रत्येक मनुष्याच्या जीवनात त्याला भाऊ-बहिण, काका - काकू ,आई - वडील मावशी - काका ,आत्या - मामा ,पत्नी ,मित्र इत्यादी अनेक प्रकारचे नाते निर्माण होत असतात.
या मधील सर्वच नातेसंबंधाची भूमिका व त्यांचे सहकार्य ही वेगवेगळ्या प्रकारचे असलेले दिसून येते. यात आपणास आणखी दोन प्रकारचे नातेसंबंध असलेले दिसून येतात त्यात कौटुंबिक व व्यावसायिक या दोन स्तरावर हे संबंध निर्माण होताना आपणास दिसून येतात .यात भाऊ- बहीण, आई- वडील ,काका -काकू, मावशी, आत्या हे सर्व कौटुंबिक नाते संबंध तर डॉक्टर - पेशंट, वकील - क्लाइंट ,दुकानदार आणि ग्राहक इत्यादी स्वरूपाची व्यवसाय स्तरावरती संबंध निर्माण होताना दिसतो.
आज आपण २१व्या शतकात राहतआहो अलीकडे हे नातेसंबंध जोपासण्याची भूमिका किंवा नातेसंबंधांविषयी रुची कमी होत असताना आपणास दिसून येत आहे . सर्वीकडे एक प्रकारचे आभासी विश्वात रममाण होण्यातील रुची अलीकडील समाजजीवनात वाढत असताना आपणास दिसून येत आहे, हे सर्व तंत्रज्ञानाचा वाढलेला वापर हे त्यामागचे कारण आहे . मोबाईल ,कॉम्प्युटर ,टि.व्हि इत्यादी उपकरणांमध्ये माणूस गुरफटलेला असलेले आपणास दिसून येईल.
पूर्वी सर्व लोक एकमेकांसाठी वेळ काढत सणसमारंभ या निमित्य भेटी देत आप्तस्वकीयांन सोबत आपला वेळ आनंदात घालवीत परंतु अलीकडे तसे होताना आपणास दिसून येत नाही. थेट समोरासमोर प्रत्यक्ष मानवी संवाद हा अलीकडे कमी होताना दिसत आहे. आपले सुख- दुःख ,अनुभव या गोष्टी आजकाल पूर्वीपेक्षा कमी प्रमाणात लोक प्रत्यक्षात एकमेकांशी भेटून व्यक्त होताना दिसतात आणि हे सर्व आता फेसबुक व्हाट्सएप इंस्टाग्राम या सारख्या साधनांचा वापर करून होताना दिसत आहे.
या ठिकाणी नेक डाउन (Neck down)संस्कृति म्हणजे मोबाईल संस्कृतीचा उदय झाला असल्याचे आपणास दिसून येते. सर्व क्षेत्रात फक्त संगणक, मोबाईल यावर इंटरनेटचा वापर करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसते. त्यातल्या त्यात सर्वात प्रिय म्हणजे मोबाईल . तुम्ही बस स्टेशन, रेल्वे स्टेशन ,हॉस्पिटल, कार्यालय अशाप्रकारे कुठलेही ठिकाण असून तिथे मोबाईल वापरतांना बरेच जण तुम्हाला दिसेल . त्यामुळे तेथील होणारा मानवी संवाद हरपलेला दिसेल. मोबाईल व संगणक वरती इंटरनेटचा वापर करणे हे आज चुकीचे आहे असे म्हणता येत नाही कारण प्रत्येक क्षेत्रात त्यामुळे सुधारणा होत आहे . आपले जीवन हे सुसह्य होत आहे . प्रत्येक कार्यास गती प्राप्त झाली आहे परंतु या ठिकाणी मात्र दुसरीकडे या साधनांच्या अतिरेकी वापरामुळे मानवी नातेसंबंध कुठतरी धोक्यात येताना दिसत आहे. मानवी जीवनावर दूरगामी परिणाम होत आहे. याठिकाणी मोबाईल चे व्यसन अनेकांना जडत आहे. त्यामुळे बरेच लोकांचे मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे . निद्रानाश ,डिप्रेशन यासारख्या समस्या निर्माण होत आहे एवढेच नव्हे तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयुष्यातील तरुणांचा महत्त्वाचा वेळ करियर घडविण्यासाठी आवश्यक आहे तो त्यामुळे वाया जात आहे. टीक टॉक वरचे व्हिडिओ बघने ,तासंतास गेम खेळणे ,चॅट करणे आणि सातत्याने ऑनलाइन राहण्याच्या नादात आपला बहुमूल्य वेळ आपण वाया घालवतो त्यामुळेच याचा वापर मर्यादित व आवश्यक प्रमाणात यथोचित केला तर आपणास भविष्यात मानवी संबंध सुरक्षित ठेवता येईल व आपलं भविष्य आपल्याला घडवता येईल .
-: सुमित अतकुलवार
Mst kup ,chan
ReplyDeletethanks
ReplyDelete