असे हे आपले पुरके सर.. मराठी कविता १०

  असे हे आपले पुरके सर... खेळ असो ,नृत्य असो ,संगीत असो की असो सूत्रसंचालन विद्यार्थ्यांना घडवीण्यासाठी सतत धडपडणारे  असे हे आपले पुरके सर... समुद्राच्या तळापेक्षाही खोल त्यांच्या अंतर्मनाची खोली.. अन् पर्वताच्या उंचीपेक्षाही मोठी त्यांची कीर्ती.. समायोजनाचे सूत्र हाती घेवून जीवनातील जबाबदारीचे जणू शिवधनुष्यच पेलणारे असे हे आपले पुरके सर... सीनियर ज्युनिअर असा कधी भेदच त्यांनी केला नाही.. अन कुणालाही न दुखवता फक्त हो सर म्हणूनच सर्वांची मने जिंकणारे असे हे आपले पुरके सर... विनोदी, खेळकर,निरागस असे फुलांसारखे त्यांचे व्यक्तिमत्व  जणू लोकनायक परिवारातील  भाऊ कदमच.. असे हे आपले पुरके सर... कुणाचा अपमान करणे, दुखवणे कुणाची उणीदुणी काढणे हा मुळात त्यांचा स्वभावच नाही असे निकोप स्वच्छ मनाचे  असे हे आपले पुरके सर... चित्रपटांन प्रमाणेच आपल्या  सर्वांनाच कार्यरत असतांना  कॉमिक रिलीफ देणारे असे हे आपले पुरके सर... सर्वांचा सन्मान करणारे, सर्वांचा आदर करणारे, सर्वांना मार्गदर्शन करणारे, सर्वांना समजून घेणारे सर्वांना सहकार्य करणारे असे हे आपले पुरके सर... कवी:- सुमित अतकुलवार 

MARATHI POEM - 5


राजे हो ,माणूस होणे नाही परवडले 





राजे हो ,माणूस होणे नाही परवडले 
माणसा पेक्षा जनावरेच बरी
माणसा पेक्षा जनावरेच बरी
कारण जशी ती दिसते तशीच ती आहे खरी


 बघा त्या मुंगी कडे एवढीशी ती मुंगी
 परंतु तिची शिस्त मोठी,
 एका रांगेत चालते  परंतु माणूस रस्त्यावरून पळते इकडे तिकडे,  
 नाही चालत  लाईनीत ,नाही पहात सिग्नल, नाही पाळत नियम 
 म्हणून  म्हणतो राजे हो ,माणूस होणे नाही परवडले 
 माणसापेक्षा जनावरेच बरी



कुत्रा म्हणून माणूस देतो दुसऱ्यास शिवी
पण कुत्रे इतकी इमानदारी कुठे आहेत का त्यांच्या अंगी बरी
कुत्रा ठेवतो उपकाराची जाण
आणि जपतो मालकाची शान
पण माणूस विसरतो सर्व उपकाराचे वाण
म्हणून  म्हणतो राजे हो ,माणूस होणे नाही परवडले 
माणसापेक्षा जनावरेच बरी


 एकदा सरडा परवडला राजे हो
 कमीत कमी जीव वाचवाले बदलते देतो तो त्याचा रंग
 पण माणूस त्याच्या पेक्षा भारी
 स्वार्थासाठी बदलते त्याचा रंग सेकंदा परी
 म्हणून  म्हणतो राजे हो ,माणूस होणे नाही परवडले 
 माणसापेक्षा जनावरेच बरी



सापापेक्षा आहे माणसाची जीभ जास्त विषारी
साप डसला तर माणूस एकदाच मरतो. 
माणूस मात्र आपल्या जीभेने डसुन वारंवार दुसऱ्याले मारतो
म्हणून  म्हणतो राजे हो ,माणूस होणे नाही परवडले 
माणसापेक्षा जनावरेच बरी
   
                                                                                        - सुमित संजय अतकुलवार

Comments

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Popular posts from this blog

अंक चार (मराठी कविता नंबर ९)..

MARATHI POEM - 6