असे हे आपले पुरके सर.. मराठी कविता १०

  असे हे आपले पुरके सर... खेळ असो ,नृत्य असो ,संगीत असो की असो सूत्रसंचालन विद्यार्थ्यांना घडवीण्यासाठी सतत धडपडणारे  असे हे आपले पुरके सर... समुद्राच्या तळापेक्षाही खोल त्यांच्या अंतर्मनाची खोली.. अन् पर्वताच्या उंचीपेक्षाही मोठी त्यांची कीर्ती.. समायोजनाचे सूत्र हाती घेवून जीवनातील जबाबदारीचे जणू शिवधनुष्यच पेलणारे असे हे आपले पुरके सर... सीनियर ज्युनिअर असा कधी भेदच त्यांनी केला नाही.. अन कुणालाही न दुखवता फक्त हो सर म्हणूनच सर्वांची मने जिंकणारे असे हे आपले पुरके सर... विनोदी, खेळकर,निरागस असे फुलांसारखे त्यांचे व्यक्तिमत्व  जणू लोकनायक परिवारातील  भाऊ कदमच.. असे हे आपले पुरके सर... कुणाचा अपमान करणे, दुखवणे कुणाची उणीदुणी काढणे हा मुळात त्यांचा स्वभावच नाही असे निकोप स्वच्छ मनाचे  असे हे आपले पुरके सर... चित्रपटांन प्रमाणेच आपल्या  सर्वांनाच कार्यरत असतांना  कॉमिक रिलीफ देणारे असे हे आपले पुरके सर... सर्वांचा सन्मान करणारे, सर्वांचा आदर करणारे, सर्वांना मार्गदर्शन करणारे, सर्वांना समजून घेणारे सर्वांना सहकार्य करणारे असे हे आपले पुरके सर... कवी:- सुमित अतकुलवार 

MARATHI POEM - 4



जीवन हे विरोधाभासी आहे


जिथे पाप आहे तिथे पुण्य आहे
 जिथे सत्य आहे तिथे असत्य आहे
तसेच जिथे रात्र आहे तिथे दिवस आहे
कारण जीवन हे विरोधाभासी आहे


एकीकडे देव आहे तर दुसरीकडे दानव आहे
तसेच जिथे जन्म आहे तिथे मृत्यु आहेच
कारण जीवन हे विरोधाभासी आहे


एकीकडे गरीबी आहे तर दुसरीकडे श्रीमंती आहे
 एकीकडे मालक तर दुसरीकडे नोकर आहे 
तसेच एकीकडे समाज सुधारक आहे 
तर दुसरीकडे समाजद्रोही आहे 
कारण जीवन हे विरोधाभासी आहे


एकीकडे सुशिक्षित तर दुसरीकडे अशिक्षित आहे
एकीकडे राजकारण तर दुसरीकडे समाजकारण आहे
कारण जीवन हे विरोधभासी आहे


जिथे प्रेम आहे तिथे घृणा आहे
जिथे अहिंसा तिथे हिंसा देखील आहे
कारण जीवन हे विरोधाभासी आहे


जीवन हे एकाच नाण्याच्या दोन  विरोधी बाजू आहे
एक चित तर दुसरी पट आहे
कारण जीवन हे विरोधाभासी आहे 


                                                            
                                                               -   सुमित संजय अतकुलवार 

Comments

  1. Tuzya hi kwita tr mazya hrdyat ch ghar karun geli re...
    Hruday sprshi kwita hoti..

    ReplyDelete
  2. Jithe kawita ahe tethe sumit ahe manu aj ya jagat kawita jiwant ahe tumchy shbdhanch swagat ahe manun sumit kawita he jiwant ahe manun sumit kawita hi jiwant ahe

    ReplyDelete

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Popular posts from this blog

अंक चार (मराठी कविता नंबर ९)..

MARATHI POEM - 6