Posts

Showing posts from May, 2020

असे हे आपले पुरके सर.. मराठी कविता १०

  असे हे आपले पुरके सर... खेळ असो ,नृत्य असो ,संगीत असो की असो सूत्रसंचालन विद्यार्थ्यांना घडवीण्यासाठी सतत धडपडणारे  असे हे आपले पुरके सर... समुद्राच्या तळापेक्षाही खोल त्यांच्या अंतर्मनाची खोली.. अन् पर्वताच्या उंचीपेक्षाही मोठी त्यांची कीर्ती.. समायोजनाचे सूत्र हाती घेवून जीवनातील जबाबदारीचे जणू शिवधनुष्यच पेलणारे असे हे आपले पुरके सर... सीनियर ज्युनिअर असा कधी भेदच त्यांनी केला नाही.. अन कुणालाही न दुखवता फक्त हो सर म्हणूनच सर्वांची मने जिंकणारे असे हे आपले पुरके सर... विनोदी, खेळकर,निरागस असे फुलांसारखे त्यांचे व्यक्तिमत्व  जणू लोकनायक परिवारातील  भाऊ कदमच.. असे हे आपले पुरके सर... कुणाचा अपमान करणे, दुखवणे कुणाची उणीदुणी काढणे हा मुळात त्यांचा स्वभावच नाही असे निकोप स्वच्छ मनाचे  असे हे आपले पुरके सर... चित्रपटांन प्रमाणेच आपल्या  सर्वांनाच कार्यरत असतांना  कॉमिक रिलीफ देणारे असे हे आपले पुरके सर... सर्वांचा सन्मान करणारे, सर्वांचा आदर करणारे, सर्वांना मार्गदर्शन करणारे, सर्वांना समजून घेणारे सर्वांना सहकार्य करणारे असे हे आपले पुरके सर... कवी:- सुमित अतकुलवार 

MARATHI POEM - 7

Image
  संघर्षाच्या वाटेवर थोडा थोडा चालत जा.. संघर्षाच्या वाटेवर थोडा थोडा चालत जा... एकटा असला तरी धीराने थोडा थोडा वागत जा.. सोबत नाही कोणी म्हणून, निराशेच्या छायेतून वाचत जा.. जीवनाच्या वाटेवर चालताना संघर्षाला पर्याय नाही म्हणून, संघर्षाच्या वाटेवर थोडा-थोडा चालत जा. संघर्षाच्या वाटेवर चालताना तुला बरेच कटू अनुभव येणार कुणी तुला वेड्यात काढणार तर कुणी तुझ्यावर हसणार हे सर्व तू थोड- थोड सहन करत जा अन् संघर्षाच्या वाटेवर थोडा थोडा चालत जा संघर्षरुपी जीवनात चालताना तुझे ध्येय गाठण्यासाठी, या सर्वांकडे थोड-थोड दुर्लक्ष करीत जा.. अन् संघर्षाच्या वाटेवर थोडा थोडा चालत जा.. संघर्षाची वाट ही नाही कोणासाठी सोपी म्हणून, या संघर्षाच्या काळातून चालताना थोडे- थोडे सकारात्मक पाऊल ठेवत जा.. अन् संघर्षाच्या वाटेवर थोडा थोडा चालत जा.. विजय तुझाच निश्चित आहे , हे विसरू नको चालत जा.. फक्त थोडा प्रयत्न वाढवून  तुझ्या प्रयत्नरुपी परमेश्वरावर विश्वास ठेवत जा.. अन् संघर्षाच्या वाटेवर थोडा थोडा चालत जा.. सुमित संजय अतकुलवार

MARATHI POEM - 6

Image
                                                                   नवी  पहाट....  एकदा पुन्हा नव्याने जीवन  चक्र सुरू झाले आहे एक नवी आशा, नवे विचार  आणि नवी पहा ट झाली आहे.... कोरोनामुळे विस्कळीत झालेले जीवन  निसर्ग नियमानुसार पुन्हा अनुकूलन करत आहे... विधात्याने लिहिलेल्या कोरोनारुपी  संकटाशी दोन हात करत,  दैनंदिन जीवन जगण्यास   लोक कंबर कसून तयार झाले आहे... मध्यंतरी काही दिवस   काळाने जणू जीवनचक्रच स्तब्ध केले , असे दृश्य आप णास दाखविले आहे.... त्यातूनच मग सर्वत्र दिसत होती  ती निराशा ,दुःख, भीती आणि मृत्यूचे भीषण तांडव परंतु परिवर्तनाच्या निसर्ग नियमानुसार  जणू पुन्हा मानवी जीवनात  नवी पहाट आली आहे....   नवी पहाट आली आहे......                                                                                              सुमित संजय अतकुलवार

MARATHI POEM - 5

राजे हो , माणूस  होणे नाही परवडले  राजे हो ,माणूस होणे नाही परवडले  माणसा पेक्षा जनावरेच बरी माणसा पेक्षा जनावरेच बरी कारण जशी ती दिसते तशीच ती आहे खरी  बघा त्या मुंगी कडे एवढीशी ती मुंगी  परंतु तिची शिस्त मोठी,  एका रांगेत चालते  परंतु माणूस रस्त्यावरून पळते इकडे तिकडे,    नाही चालत  लाईनीत ,नाही पहात सिग्नल, नाही पाळत नियम   म्हणून  म्हणतो राजे हो ,माणूस होणे नाही परवडले   माणसापेक्षा जनावरेच बरी कुत्रा म्हणून माणूस देतो दुसऱ्यास शिवी पण कुत्रे इतकी इमानदारी कुठे आहेत का त्यांच्या अंगी बरी कुत्रा ठेवतो उपकाराची जाण आणि जपतो मालकाची शान पण माणूस विसरतो सर्व उपकाराचे वाण म्हणून  म्हणतो राजे हो ,माणूस होणे नाही परवडले  माणसापेक्षा जनावरेच बरी  एकदा सरडा परवडला राजे हो  कमीत कमी जीव वाचवाले बदलते देतो तो त्याचा रंग  पण माणूस त्याच्या पेक्षा भारी  स्वार्थासाठी बदलते त्याचा रंग सेकंदा परी  म्हणून  म्हणतो राजे हो ,माणूस होणे नाही परवडले   माणसापेक्षा जनावरेच बरी सापापेक्षा आहे माणसाची जीभ जास्त विषारी साप डसला तर माणूस एकदाच मरतो.  माणूस मात्र आपल्या जीभेने डसुन वारंवार दुसऱ्याले मारतो म्हण

MARATHI POEM - 4

Image
जीवन हे विरोधाभासी आहे जिथे पाप आहे तिथे पुण्य आहे  जिथे सत्य आहे तिथे असत्य आहे तसेच जिथे रात्र आहे तिथे दिवस आहे कारण जीवन हे विरोधाभासी आहे एकीकडे देव आहे तर दुसरीकडे दानव आहे तसेच जिथे जन्म आहे तिथे मृत्यु आहेच कारण जीवन हे विरोधाभासी आहे एकीकडे गरीबी आहे तर दुसरीकडे श्रीमंती आहे  एकीकडे मालक तर दुसरीकडे नोकर आहे  तसेच एकीकडे समाज सुधारक आहे  तर दुसरीकडे समाजद्रोही आहे  कारण जीवन हे विरोधाभासी आहे एकीकडे सुशिक्षित तर दुसरीकडे अशिक्षित आहे एकीकडे राजकारण तर दुसरीकडे समाजकारण आहे कारण जीवन हे विरोधभासी आहे जिथे प्रेम आहे तिथे घृणा आहे जिथे अहिंसा तिथे हिंसा देखील आहे कारण जीवन हे विरोधाभासी आहे जीवन हे एकाच नाण्याच्या दोन  विरोधी बाजू आहे एक चित तर दुसरी पट आहे कारण जीवन हे विरोधाभासी आहे                                                                                                                              -   सुमित संजय अतकुलवार