असे हे आपले पुरके सर.. मराठी कविता १०

  असे हे आपले पुरके सर... खेळ असो ,नृत्य असो ,संगीत असो की असो सूत्रसंचालन विद्यार्थ्यांना घडवीण्यासाठी सतत धडपडणारे  असे हे आपले पुरके सर... समुद्राच्या तळापेक्षाही खोल त्यांच्या अंतर्मनाची खोली.. अन् पर्वताच्या उंचीपेक्षाही मोठी त्यांची कीर्ती.. समायोजनाचे सूत्र हाती घेवून जीवनातील जबाबदारीचे जणू शिवधनुष्यच पेलणारे असे हे आपले पुरके सर... सीनियर ज्युनिअर असा कधी भेदच त्यांनी केला नाही.. अन कुणालाही न दुखवता फक्त हो सर म्हणूनच सर्वांची मने जिंकणारे असे हे आपले पुरके सर... विनोदी, खेळकर,निरागस असे फुलांसारखे त्यांचे व्यक्तिमत्व  जणू लोकनायक परिवारातील  भाऊ कदमच.. असे हे आपले पुरके सर... कुणाचा अपमान करणे, दुखवणे कुणाची उणीदुणी काढणे हा मुळात त्यांचा स्वभावच नाही असे निकोप स्वच्छ मनाचे  असे हे आपले पुरके सर... चित्रपटांन प्रमाणेच आपल्या  सर्वांनाच कार्यरत असतांना  कॉमिक रिलीफ देणारे असे हे आपले पुरके सर... सर्वांचा सन्मान करणारे, सर्वांचा आदर करणारे, सर्वांना मार्गदर्शन करणारे, सर्वांना समजून घेणारे सर्वांना सहकार्य करणारे असे हे आपले पुरके सर... कवी:- सुमित अतकुलवार 

MARATHI POEM 1




 इथे मनाशी खेळणे हा रोजचाच खेळ आहे  



इथे मनाशी खेळणे हा रोजचाच खेळ आहे
हे बघण्यास इथे कुणास वेळ आहे
      
देव खेळतो भक्तांच्या मनाशी
  सरकार खेळते  नागरिकांच्या मनाशी
  प्रेयसी खेळते प्रियकराच्या मनाशी
श्रीमंत खेळतात गरिबांच्या मनाशी


इथे मनाशी खेळणे हा रोजचाच खेळ आहे
हे बघण्यासइथे कुणास वेळ आहे


  डॉक्टर खेळतो रुग्णांच्या मनाशी
   वकील खेळतो अशिलाच्या मनाशी
    मालक खेळतात नोकरांच्या मनाशी
     पक्षनेते खेळतात कार्यकर्त्यांच्या मनाशी


    इथे मनाशी खेळणे हा रोजचाच खेळ आहे
हे बघण्याची कुणास वेळ आहे
               
                        @  सुमित संजय अतकुलवार

Comments

  1. सत्य परिस्थिती लक्षात घेऊन लिहली आहै तू भावा

    ReplyDelete
  2. Wonderful,.. Ausome poem..

    I wish, u Wright poem ever ever forever.. As best as

    ReplyDelete
    Replies
    1. thx bro for your warm wishes for me and and your love and affection

      Delete
  3. Wonderful,.. Ausome poem..

    I wish, u Wright poem ever ever forever.. As best as

    ReplyDelete
  4. अप्रतिम आहे कविता , खुप छान

    ReplyDelete

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Popular posts from this blog

अंक चार (मराठी कविता नंबर ९)..

MARATHI POEM - 6