कोरोना व्हायरस जनु एक रक्तबीजासुर
आपण बरेचदा म्हणतो की पुराणातील वांगी पुराणात परंतु आजची जी परिस्थिती आहे त्यावरून आपणास असे दिसून येते की काही गोष्टी धार्मिक पुराणातल्या गोष्टी काल्पनिक वाटतात त्यात सत्यता भासते जसे उदाहरण घ्यायचे झाले तर आज कोरोना व्हायरस व रक्तबीज नावाचा असुर यात आपणास साम्य दिसून येईल धार्मिक मान्यतेनुसार रक्तबीज नावाच्या दानवाला असे वरदान प्राप्त झाले होते कि त्याचा रक्ताचा एक थेंब जरी जमिनीवर पडला तर त्याठिकाणी रक्तबीज सारखा दिसणारा दुसरा दानव निर्माण होत होता त्यासाठी दुर्गा मातेने काली देवीचे रूप धारण करुन त्याचा वध केला करताच त्याला ठार केले तिथे रक्त पडत व त्यातून नवीन रक्तबीज तयार होते त्यामुळे त्याचा वध करणे कठीण झाले होते म्हणून मग काली मातेने त्याची मान कापून त्याचे डोके खपपर मध्ये ठेवले व एकही थेंब रक्त खाली सांडू दिले नाही आणि त्यांचे संपुर्ण रक्तप्राशन केले. त्याच प्रमाणे आज आपल्याला कोरोना व्हायरस असल्याचे दिसत आहे. एका व्यक्तीला लागन होताच त्या व्यक्तीचा स्पर्श ज्या ज्या वस्तूला होईल त्या वस्तूच्या अगर व्यक्तींच्या संपर्कात आल्यास कोरोना ची म्हणजेच कोविद-19 लागण होत आहे म्हणून यावर उपाय म्हणजे सामूहिक ठिकाणी एकत्र न येने व आल्यास योग्य खबरदारी घेणे होय म्हणून विनाकारण बाहेर जाणे टाळणे व्यक्तीच्या संपर्कात न येणे हीच काय ती काळजी अत्यंत महत्वपूर्ण दिसून येते .
मग आपल्यासमोर प्रश्न उठतो हा व्हायरस कुठून आला? तर इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजि नॅशनल बायोसेफ्टी लॅब वुहान, चीन जानेवारी 2019 मध्ये चिनी लोक प्रयोगशाळेत इतर व्हायरस चे परिक्षण करता हा व्हायरस त्यांना दिसला व तो सार्स व्हायरस प्रमाणे आहे त्यांना जाणवले व्हायरस वरती प्रतिबंध करण्याऐवजी चीनने त्या व्हायरसला जगापासून लपवण्याचा प्रयत्न केला त्यात डॉ.लि. नावाच्या व्यक्तीने सर्वप्रथम हा व्हायरस नवीन असल्याची माहिती सर्वांना दिली आणि त्याची लागण त्यांना होऊन त्यातच त्यांचा मृत्यू झाला या ठिकाणी हा वायरस निर्मितीचे दोन कारणे मानले जात आहे एक वटवाघूळ मुळे हा व्हायरस आला आणि दुसरे चीन या देशांनी एक प्रकारे जे संशोधन केले त्यातून हा वायरस निर्माण झाला परंतु खरे कारण कोणते हे अद्याप समोर नाही.
कोरोनाची लागण झाल्यास पुढील लक्षणे २ ते १४ दिवसापर्यंत दिसतात. जास्त दिवस ताप राहणे, श्वास घेण्यास अडथळा होणे, वाहते नाक ,डोकेदुखी, अंगदुखी ,थकवा ,कोरडा खोकला आणि अतिसार ही लक्षणे दिसतात . हा व्हायरस सर्वात जास्त वृद्ध लोक आणि उच्च रक्तदाब, हृदयरोग किंवा मधुमेह यासारख्या मूलभूत वैद्यकीय समस्या असणाऱ्या लोकांना गंभीर आजार होण्याची शक्यता असते.
यावर उपचार म्हणजे निश्चित असे औषध सध्या उपलब्ध नाही या आजाराने भारतात पहिला मृत्यू दिनांक 12 मार्च 2020 रोजी कर्नाटक राज्याच्या कलबुर्गी जिल्ह्यात 76 वर्षांच्या वृद्धाचा तर दुसरा 13 मार्च 2020 रोजी दिल्लीतील एक वृद्ध महिलेचा झाला. महाराष्ट्र मध्ये दिनांक 15 मार्च 2020 पर्यंत33 रुग्ण आढळले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक महामारी घोषित केली आहे व 138 देशात त्याचा प्रसार झाला असून चीन, इटली व इराण या देशात सर्वात जास्त रुग्ण आहेत . भारतात सर्वात जास्त महाराष्ट्रात रुग्णांची संख्या आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने शाळांना सुट्टी घोषित केल्या त्याचप्रमाणे चित्रपटगृहे, व्यायाम शाळा, मंदिरे, पान टपरी पासून ते मोठ्या मॉल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. पुणे, यवतमाळ यासारख्या शहरांमध्ये कलम 144 लागू करण्यात आली असून त्यानुसार पाच व्यक्ती पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र थांबू शकत नाही म्हणून ,यापासून बचाव करण्यासाठी तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाचे आहेत सर्वात प्रथम आपले हात धुणे हात धुताना पाणी ,साबण किंवा सैनीटायझर चा वापर करावा . दुसरे खोकलताना टिशू पेपर चा किंवा रुमालाचा वापर करणे आणि तिसरे म्हणजे हात न धुता डोळे नाक तोंड यांना हात लावू नये कारण कोरोना व्हायरस हा डोळे तोंड व नाक यांद्वारे शरीरामध्ये प्रवेश करू शकतो याच प्रमाणे बीमार व्यक्तीच्या एक मीटर दूर राहणे महत्त्वाचे आहे .
त्यामुळे आपण सर्वांनी या महामारी लढा देण्यासाठी जागृत होऊन बचावात्मक उपाययोजना करणेही संपूर्ण मानव जाती वाचवण्यासाठी वर्तमानकालीन सर्वात मोठे पाऊल असेल म्हणून अफवांना बळी न पडता या संकटाशी दोन हात करून कोरोना मुक्त समाज हीच तातडीची गरज आहे.
सुमित संजय अतकुलवार
Comments
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box