Posts

Showing posts from April, 2020

असे हे आपले पुरके सर.. मराठी कविता १०

  असे हे आपले पुरके सर... खेळ असो ,नृत्य असो ,संगीत असो की असो सूत्रसंचालन विद्यार्थ्यांना घडवीण्यासाठी सतत धडपडणारे  असे हे आपले पुरके सर... समुद्राच्या तळापेक्षाही खोल त्यांच्या अंतर्मनाची खोली.. अन् पर्वताच्या उंचीपेक्षाही मोठी त्यांची कीर्ती.. समायोजनाचे सूत्र हाती घेवून जीवनातील जबाबदारीचे जणू शिवधनुष्यच पेलणारे असे हे आपले पुरके सर... सीनियर ज्युनिअर असा कधी भेदच त्यांनी केला नाही.. अन कुणालाही न दुखवता फक्त हो सर म्हणूनच सर्वांची मने जिंकणारे असे हे आपले पुरके सर... विनोदी, खेळकर,निरागस असे फुलांसारखे त्यांचे व्यक्तिमत्व  जणू लोकनायक परिवारातील  भाऊ कदमच.. असे हे आपले पुरके सर... कुणाचा अपमान करणे, दुखवणे कुणाची उणीदुणी काढणे हा मुळात त्यांचा स्वभावच नाही असे निकोप स्वच्छ मनाचे  असे हे आपले पुरके सर... चित्रपटांन प्रमाणेच आपल्या  सर्वांनाच कार्यरत असतांना  कॉमिक रिलीफ देणारे असे हे आपले पुरके सर... सर्वांचा सन्मान करणारे, सर्वांचा आदर करणारे, सर्वांना मार्गदर्शन करणारे, सर्वांना समजून घेणारे सर्वांना सहकार्य करणारे असे हे आपले पुरके सर... कवी:- सुमित अतकुलवार 

MARATHI POEM - 3

Image
साहित्यच  देते उत्तर जीवनाच्या वाटेवर चालताना जीवनाशी दोन हात करताना जीवनात आलेल्या समस्यांना सोडविण्याचे साहित्यच देते उत्तर साहित्यच  आपणास दाखविते अंधकारमय जीवनात प्रकाशवाट साहित्यच दूर करते वैफल्यग्रस्त जीवन आणि जीवनास नवचैतन्य देवून साहित्यच देते उत्तर जीवन वाटेतील खाचखळग्यांना  जीवनात येणाऱ्या त्या गतिरोधकांना साहित्यच देते उत्तर समाजातल्या विषमतेला, जातीयतेला व भेदाभेदाला ही  साहित्यच देते उत्तर देशद्रोही ,समाजद्रोही समाजविघातक प्रवृत्तींना साहित्यच देते उत्तर मानवजातीच्या संबंध कूप्रवृत्तीला, कुप्रथेला परखडपणे दाखवुनी  आरसा साहित्यच देते उत्तर।                                                          -  सुमित संजय अतकुलवार

# CORONA (COVID-19) ARTICLE

Image
      कोरोना व्हायरस जनु एक रक्तबीजासुर                                                                                               आपण बरेचदा म्हणतो की पुराणातील वांगी पुराणात परंतु आजची जी परिस्थिती आहे त्यावरून आपणास असे दिसून येते की काही गोष्टी धार्मिक पुराणातल्या गोष्टी काल्पनिक वाटतात त्यात सत्यता भासते जसे उदाहरण घ्यायचे झाले तर आज कोरोना व्हायरस व रक्तबीज नावाचा असुर यात आपणास साम्य दिसून येईल धार्मिक मान्यतेनुसार रक्तबीज नावाच्या दानवाला असे वरदान प्राप्त झाले होते कि त्याचा रक्ताचा एक थेंब जरी जमिनीवर पडला तर त्याठिकाणी रक्तबीज सारखा दिसणारा दुसरा दानव निर्माण होत होता त्यासाठी दुर्गा मातेने काली देवीचे रूप धारण करुन त्याचा वध केला करताच त्याला ठार केले तिथे रक्त पडत व त्यातून नवीन रक्तबीज तयार होते त्यामुळे त्याचा वध करणे कठीण झाले होते म्हणून मग काली  मातेने त्याची मान कापून त्याचे डोके खपपर मध्ये ठेवले व एकही थेंब रक्त खाली सांडू दिले नाही आणि त्यांचे संपुर्ण रक्तप्राशन केले. त्याच प्रमाणे आज आपल्याला कोरोना व्हायरस असल्याचे दिसत आहे. एका व्यक्तीला ल

MARATHI POEM 2

Image
                    शब्द हेच खरे किमयागार      शब्दच करतात प्रहार आणि शब्दच करतात प्रतिकार शब्दच आहे जीवनाचे खरे शिल्पकार शब्दाविना हे जग निराकार म्हणून शब्द हेच खरे किमायागार शब्द हेच मित्र शब्द हेच शत्रू शब्दांनीच होतो संवाद आणि शब्दांनीच होतो विवाद म्हणून शब्द हेच खरे किमयागार शब्द हीच तलवार आणि शब्द हीच आहे ढाल शब्दांनीच पेटतात माणसे, घरदार आणि समाज शब्दांनीच विजेते माणसांच्या मनांतील आग म्हणून शब्द हेच खरे किमयागार शब्द हेच यशाचे मूलमंत्र शब्द हेच अपयशाचे कारण शब्द ठरतात आयुष्याचे मार्गदर्शक आणि शब्दच ठरतात फसवे वाटाडे शब्द हेच खरे किमयागार शब्दांमुळेच आहे माणसाच्या जीवनाला खरा अर्थ शब्दांन अभावी त्याच जीवन आहे व्यर्थ म्हणून शब्द हेच खरे किमयागार                         @  सुमित संजय अतकुलवार

MARATHI POEM 1

Image
 इथे मनाशी खेळणे हा रोजचाच खेळ आहे   इथे मनाशी खेळणे हा रोजचाच खेळ आहे हे बघण्यास इथे कुणास वेळ आहे        देव खेळतो भक्तांच्या मनाशी   सरकार खेळते  नागरिकांच्या मनाशी   प्रेयसी खेळते प्रियकराच्या मनाशी श्रीमंत खेळतात गरिबांच्या मनाशी इथे मनाशी खेळणे हा रोजचाच खेळ आहे हे बघण्यासइथे कुणास वेळ आहे   डॉक्टर खेळतो रुग्णांच्या मनाशी    वकील खेळतो अशिलाच्या मनाशी     मालक खेळतात नोकरांच्या मनाशी      पक्षनेते खेळतात कार्यकर्त्यांच्या मनाशी     इथे मनाशी खेळणे हा रोजचाच खेळ आहे हे बघण्याची कुणास वेळ आहे                                         @  सुमित संजय अतकुलवार