Posts

Showing posts from June, 2021

असे हे आपले पुरके सर.. मराठी कविता १०

  असे हे आपले पुरके सर... खेळ असो ,नृत्य असो ,संगीत असो की असो सूत्रसंचालन विद्यार्थ्यांना घडवीण्यासाठी सतत धडपडणारे  असे हे आपले पुरके सर... समुद्राच्या तळापेक्षाही खोल त्यांच्या अंतर्मनाची खोली.. अन् पर्वताच्या उंचीपेक्षाही मोठी त्यांची कीर्ती.. समायोजनाचे सूत्र हाती घेवून जीवनातील जबाबदारीचे जणू शिवधनुष्यच पेलणारे असे हे आपले पुरके सर... सीनियर ज्युनिअर असा कधी भेदच त्यांनी केला नाही.. अन कुणालाही न दुखवता फक्त हो सर म्हणूनच सर्वांची मने जिंकणारे असे हे आपले पुरके सर... विनोदी, खेळकर,निरागस असे फुलांसारखे त्यांचे व्यक्तिमत्व  जणू लोकनायक परिवारातील  भाऊ कदमच.. असे हे आपले पुरके सर... कुणाचा अपमान करणे, दुखवणे कुणाची उणीदुणी काढणे हा मुळात त्यांचा स्वभावच नाही असे निकोप स्वच्छ मनाचे  असे हे आपले पुरके सर... चित्रपटांन प्रमाणेच आपल्या  सर्वांनाच कार्यरत असतांना  कॉमिक रिलीफ देणारे असे हे आपले पुरके सर... सर्वांचा सन्मान करणारे, सर्वांचा आदर करणारे, सर्वांना मार्गदर्शन करणारे, सर्वांना समजून घेणारे सर्वांना सहकार्य करणारे असे हे आपले पुरके सर... कवी:- सुमित अतकुलवार 

काश ! कोरोना नसता तर ?

Image
 काश ! कोरोना  नसता तर ?  काश ! कोरोना  नसता तर ? किती  छान झाले असते .. सर्वाना आपल्या मनासारखे जगता आले असते ... लॉकडाउन, मास्क, सॅनिटायझर, आणि सोशल डिस्टेनसिंग यांनी  त्रस्त असलेले जीवन वाट्याला आलं नसत...   काश ! कोरोना  नसता तर ? लोकांची खाण्यापिण्याची कुचंबणा झाली नसती ... रोजमजुरी करून हातावर आणून पानावरती खाणाऱ्या गरिबांची  आबाळमात्र झाली नसती ...  काश ! कोरोना  नसता तर ? भविष्य घडवू बघणाऱ्या      विद्यार्थ्यांचे शैक्षणिक  नुकसान झाले नसते ..  काश ! कोरोना  नसता तर ? कित्येक मुले आई वडिलांच्या  प्रेमाला मुकली नसती ...  काश ! कोरोना  नसता तर ? कित्येक लोकांना आपले मित्र,  नातेवाईक, आप्तेष्टान पासून दूर  होण्याची वेळ  आली  नसती ...  काश ! कोरोना  नसता तर ? कित्येक मुलींचे लग्नाचे असलेले  स्वप्न हे छोटे खाणी ​औपचारिक       सभे सारखे उरकले नसते ..  काश ! कोरोना  नसता तर ? जागतिक वैफल्यग्रस्त , नैराश्यपूर्ण व  भययुक्त वातावरण निर्मिती झाली नसती ..                                                              सुमित अतकुलवार