Posts

Showing posts from March, 2023

असे हे आपले पुरके सर.. मराठी कविता १०

  असे हे आपले पुरके सर... खेळ असो ,नृत्य असो ,संगीत असो की असो सूत्रसंचालन विद्यार्थ्यांना घडवीण्यासाठी सतत धडपडणारे  असे हे आपले पुरके सर... समुद्राच्या तळापेक्षाही खोल त्यांच्या अंतर्मनाची खोली.. अन् पर्वताच्या उंचीपेक्षाही मोठी त्यांची कीर्ती.. समायोजनाचे सूत्र हाती घेवून जीवनातील जबाबदारीचे जणू शिवधनुष्यच पेलणारे असे हे आपले पुरके सर... सीनियर ज्युनिअर असा कधी भेदच त्यांनी केला नाही.. अन कुणालाही न दुखवता फक्त हो सर म्हणूनच सर्वांची मने जिंकणारे असे हे आपले पुरके सर... विनोदी, खेळकर,निरागस असे फुलांसारखे त्यांचे व्यक्तिमत्व  जणू लोकनायक परिवारातील  भाऊ कदमच.. असे हे आपले पुरके सर... कुणाचा अपमान करणे, दुखवणे कुणाची उणीदुणी काढणे हा मुळात त्यांचा स्वभावच नाही असे निकोप स्वच्छ मनाचे  असे हे आपले पुरके सर... चित्रपटांन प्रमाणेच आपल्या  सर्वांनाच कार्यरत असतांना  कॉमिक रिलीफ देणारे असे हे आपले पुरके सर... सर्वांचा सन्मान करणारे, सर्वांचा आदर करणारे, सर्वांना मार्गदर्शन करणारे, सर्वांना समजून घेणारे सर्वांना सहकार्य करणारे असे हे आपले पुरके सर... कवी:- सुमित अतकुलवार 

अंक चार (मराठी कविता नंबर ९)..

अंक चार तुमचे पद चार दिवसाचे  तुमची प्रतिष्ठा चार दिवसांची तुमच्या गर्वाचे आयुष्यही चारच दिवसांचे तुमची अमीरी चार दिवसांची तुमची जिंदगी चार दिवसांचीच  तुमचा मृत्यू चार खांद्यांचा तुमची मालकी चार गज जमीनी पुरतीच तुमचे जीवनाचे टप्पेही चारच सासुरवास ही चारच दिवसांचा तुमच्या मुख्य दिशाही चारच तुमच्या दिवसाचे प्रहर ही चार तुम्ही जगतानाही वावरता ते चार चौघातच.. तुम्हाला पडलेला नेहमीचाच प्रश्न चार लोक काय म्हणतील? आणि शेवटी सर्वात महत्वाचे  मानवी पुरुषार्थ ही चारच.. अन् म्हणूनच मनुष्याला पूर्णत्व प्राप्त करून देणारा ही अंक चार, अंक चार, अंक चार.. कवी :- सुमित  अतकुलवार